• District 3231A4

    Be The Sunshine

Club Social Activities

चाईल्डहूड कॅन्सर डे

15 Feb 2026

वर्ल्ड चाइल्डहूड कॅन्सर डे: अलिबाग लायन्सचा अनोखा उपक्रम अलिबाग, दिनांक १५ येथील लायन्स क्लब ऑफ अलिबाग, लायन्स क्लब ३२३१A२ यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स हेल्थ फाउंडेशन , चोंढी येथील भव्य प्रांगणात कॅन्सर पीडित ६५ मुले आपल्या पालकांसह नाचगाणी, गप्पागोष्टी, फनी गेम्स, विनोद , मनमुराद भटकंतीत रमली. कराओकेवर गाणी गाऊन मुलांसहित त्यांचे पालकही आनंदात सहभागी झाले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे यांच्या सौजन्याने फेरीबोटीतून समुद्र सफरीचा , तर लायन नयन कवळे यांनी बससेवा उपलब्ध करून संपूर्ण सागरी पट्ट्यावरील फेरफटका मारण्याचा आनंद दिला. मुले आणि पालकांसहित इतर सर्व उपस्थितांना न्याहारी आणि उत्कृष्ट स्नेहभोजनासाठी लायन नितीन अधिकारी यांनी परिश्रम घेतले. क्षणभर दु:ख विसरून आनंदात न्हाऊन काढणाऱ्या या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल जाधव, चाईल्डहुड कन्सरचे डीसी देवरतन डागा, अडिल मिस्त्री, शिवकुमार साखरदांडे, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, महेंद्र पाटील, नितीन शेडगे, लायन ऋषी ओबेरॉय, रुपेश मेहता, डॉ अर्नि बुहारिवाला , इतर लायन मेंबर्स, कॅन्सर पीडित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कर्मचारी, पीडित मुले आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Benefited People 65
Raised Of Amount 0
Donated Of Amount 25000