सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.७/१०/२०२५ परहूरयेथील 'श्री समर्थ कृपा' या वृद्धाश्रमात लायन्स क्लब अलिबागच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम करुन मनोरंजन करणारा जुन्या नव्या तसेच हिंदी आणि मराठी गाण्यांचा व्यावसायिक कराओके ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित केला. वृद्धाश्रमातील जवळजवळ सारेच ज्येष्ठ संध्याकाळच्या या संगीत सोहळ्यात अक्षरशः न्हाउन निघाले. एवढेच नाही,तर आश्रमातील काही ज्येष्ठ स्वतः गाणे गाण्यासाठीही पुढे आले. या माध्यमातून आश्रमवासियांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद जवळून बघता आला. प्रमुख उपस्थितांमध्ये फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन प्रवीण सरनाईक, अलिबाग लायन अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर नयन कवळे, अनिल आगाशे, नितीन शेडगे, अभिजित आमले, प्रकाश देशमुख, तुषार नाईक, संजय माळी, विकास घरत, समीर कवळे, ॲड गौरी म्हात्रे, सीमा शेडगे, उज्ज्वला चंदनशिव आदि लायन मेंबर्स उपस्थित होते.
Benefited People | 40 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 8000 |