लायन्स क्लब अलिबागच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्र चिकित्सा शिबीर यशस्वी येथील लायन्स क्लब अलिबाग आणि रायगड श्रमिक एकता संघाच्या वतीने लायन संजय माळी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे थळ पेठ येथे आयोजन करण्यात आले. यावेळी एकूण १०४ नेत्ररुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतिबिंदूसह ३८ जणांना मोफत शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले. आरसीएफ थळ युनिटचे कार्यकारी संचालक नितिन हिरडे, जिल्हा प्रांतपाल (इलेक्ट)प्रवीण सरनाईक, नगरसेवक तथा अलिबाग लायन अध्यक्ष प्रदीप नाईक, संजय पाटील, नयन कवळे, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत पाटील,या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इलेक्टेड द्वितीय प्रांतपाल नमिता मिश्रा, महेश कवळे, अमोघ किंजवडेकर, नितीन शेडगे, तुषार नाईक, विकास घरत, अविनाश राऊळ, मनोज राऊळ, समीर कवळे, मनोज ढगे, प्रकाश कवळे, महेंद्र पाटील, संतोष पाटील, श्रद्धा राणे, शुभदा कुडतलकर , आरसीएफचे व्यवस्थापक महेश पाटील , जनसंपर्क अधिकारी कवळे, सी.आय.एस.एफ. डेप्युटी कमांडर आदी उपस्थित होते.
| Benefited People | 104 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |