लेखमाला : मानसिक स्वास्थ्य आणि उपाययोजना संपूर्ण आठवडाभर लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने समाजातील विविध वर्गातील घटकांचा विचार करून, सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, कामगार, कष्टकरी वर्ग, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी या सर्वांसाठी ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयी संपूर्ण आठवडाभर लेखमालेचे आयोजन करण्यात आले. 'कृषिवल' या प्रचंड खप असलेल्या नामांकित स्थानिक दैनिकात प्रथितयश आणि वरील विषयचा खोलवर अभ्यास असलेल्या नामवंत विचारवंतांचे लेखन हे त्याचे वैशिष्ट्य. या माध्यमातून सामान्यपणे नव्वद हजारांहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचता आले. ताणतणावातून मुक्तता मिळवण्याची गुरुकिल्ली दिली . या उपक्रमाबाबत समाजाच्या विविध स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सदर लेखमालेची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली.
| Benefited People | 91000 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 25000 |