मोफत मधुमेह तपासणी शिबिर लायन्स क्लब अलिबाग आयोजित स्व. अंजली पाटील स्मृतिदिनी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी १२० जणांनी रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी केली. ग्लुकोमिटर पद्धतीने सदर तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यानुसार पुढील वैद्यकीय सल्ला आणि औषधे देण्यात आली. यावेळी अलिबाग लायन अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, महेंद्र पाटील, नितीन शेडगे, भगवान मालपाणी, रोहन रायकर, प्रकाश देशमुख, कल्पेश थळे व अन्य लायन मेंबर्ससह रुग्ण व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
| Benefited People | 120 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |