लायन्स क्लब अलिबागने केले 'लायन्स क्वेस्ट' पुस्तकांचे वाटप पाली- सुधागड तालुक्यातील पडसरे येथील अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत 'उमलतं वय आणि किशोरांसाठी सकारात्मक कौशल्ये ' चारित्र्य संवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वासाठी जीवनावश्यक कौशल्यांचा विकास साधण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील इयत्ता सहावी, सातवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका आणि पालकांसाठी मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी 3231A4चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन संजीव सूर्यवंशी, लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, लायन महेंद्र पाटील इतर लायन मेंबर्स, शिक्षक ,विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साधारण १६८विद्यार्थी व पालकांना सदर पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
| Benefited People | 168 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |