जागतिक समुद्र किनारा स्वच्छतादिन जागतिक समुद्र किनारा स्वच्छतादिनाच्या औचित्याने शनिवार, दिनांक २०सप्टेंबर, २०२५रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता अलिबाग बीचवर चाळीसहून अधिक लायन मेंबर्स उपस्थित होते. यावेळी उद्घाटनपर कार्यक्रमानंतर हँडग्लोज घालून, हातात झाडू, फावडे, बकेट ही आवश्यक साधने घेऊन, संपूर्ण किनारा स्वच्छ करण्यासाठी एकवटले. त्यांच्या सोबत अलिबाग नगरपरिषदेचे कर्मचारी आणि इतरही अनेकजण होते. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हाधिकारी डॉ किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नेहा भोसले, लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, लायन अनिल म्हात्रे, नयन कवळे, भगवान मालपाणी,गिरीश म्हात्रे, गौरी म्हात्रे,प्रकाश देशमुख, रोहन पाटील ,ढगे आदी उपस्थित होते.
Benefited People | 1000 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 5000 |