वरसोली बीचवर लायन्स क्लब अलिबाग तर्फे क्रिकेट स्पर्धा संपन्न. _______________________ अलिबाग, दिनांक २ लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या क्रिकेट टूर्नामेंट वरसोलीच्या भव्य मैदानावर घेण्यात आली. यामध्ये अलिबाग लायन्ससह अलिबाग डायमंड्स चे महिला संघही सहभागी झाले होते. तब्बल आठ टीमच्या सहभागामुळे स्पर्धेला मोठे स्वरुप प्राप्त झाले. यात महिलांमध्ये चित्रा लोंढे टीम तर लायन्स अलिबाग मध्ये संजय पाटील टीम विजेती, तर परेश भतेजा यांची टीम उपविजेती ठरली. नवोदित तरुणांसह अगदी सिक्सटीप्लस ज्येष्ठ लायन मेंबर्सचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. यानिमित्ताने दीडशेहून अधिक लायन मेंबर्स खिलाडूवृत्तीने एकत्र आले. आपला शारीरिक फिटनेस जपून खिलाडूवृत्ती वाढवण्यासाठी सर्व लायन मेंबर्सने अशाप्रकारे नियमितपणे मैदानात उतरण्याचे आवाहन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रवीण सरनाईक यांनी केले. अलिबाग लायन अध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या टूर्नामेंट्सच्या उद्घाटनप्रसंगी फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे, नितीन अधिकारी, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, अलिबाग डायमंड अध्यक्ष श्रुती सरनाईक, डॉ रेखा म्हात्रे, ॲड महेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लायन रोहन पाटील, रोहन रायकर, संजय पाटील,परेश भतेजा ,प्रियदर्शनी पाटील, संतोष सागवेकर, रणजित जैन, अमोघ किंजवडेकर, संतोष पाटील, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी, अविनाश राऊळ, रमेश धनावडे, संजय माळी, दीपक पाटील, जितेन पाटील,अनिल आगाशे, नितीन शेडगे यांच्यासह चेअरपर्सन प्रितम गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.
| Benefited People | 140 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |