व्याख्यानमाला : मानसिक स्वास्थ्य आणि उपाययोजना संपूर्ण आठवडाभर लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने समाजातील विविध वर्गातील घटकांचा विचार करून, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, कामगार, कष्टकरी वर्ग,सर्वसामान्य नागरिक या सर्वांसाठी ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयी संपूर्ण आठवडाभर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. आरसीएफ सभागृह, क्षात्रैक्य समाज हॉल, कुरुळ हायस्कूलचे भव्य सभागृह या विविध ठिकाणी नामांकित व्याख्यात्यांना आमंत्रित करण्यात आले. यामध्ये डॉ मानदा पंडित, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ निर्मला राव, संदीप जगे व अन्य मान्यवर वक्त्यांनी समाजातील विविध घटकांना संबोधित केले. ताणतणावातून मुक्तता मिळवण्याची गुरुकिल्ली दिली . या उपक्रमाबाबत समाजाच्या विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. प्रत्येक व्याख्यानाला सरासरी तीनशेहून अधिक उपस्थिती होती. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबाग अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, महेंद्र पाटील, संतोष पाटील, प्रकाश देशमुख आणि अन्य लायन्स सभासदही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
| Benefited People | 1900 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |