• District 3231A4

    Together We Serve

Club Social Activities

Lions Club of Khopoli will provide vaccine of snake bite for MSEB servants

29 Jul 2026

खोपोली महावितरण कर्मचारी यांना लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे मदतीचा हात खोपोली नगरपरिषद हद्दीतील नागरी व्यवस्था सुरळीतपणे पार पडणेसाठी महावितरण कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असतात. वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी या कर्मचाऱ्यांना झाडी,झुडपे,कचरा कुंड्या येथे देखील रात्री बेरात्री पण जावे लागते. अशी सेवा देत असताना या कर्मचाऱ्यांना सर्पदंश देखील होतात. हि समस्या लक्षात घेऊन आज लायन्स क्लब अध्यक्ष शैली मेहता,सेक्रेटरी एकता भदोरीया आणि प्रोजेक्ट चेअरमन प्रशांत साठे यांनी महावितरण मुख्य अभियंता श्री.वाघमोडे साहेब यांची भेट घेतली. खोपोली महावितरण कर्मचारी यांस दुर्दैवाने ऑन ड्युटी सर्प दंश झाल्यास त्या कर्मचाऱ्यास खोपोली नगरपरिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे उपचारा दरम्यान सर्पदंश लसीची रक्कम लायन्स क्लब ऑफ खोपोली मार्फत देण्यात येईल असे लेखी पत्राद्वारे महावितरण खोपोली यांना आश्वासन दिले आहे.

Benefited People 100
Raised Of Amount 1000
Donated Of Amount 1000