टीम बिल्डिंग: अलिबाग लायन्सची सहल लायन्स क्लब ऑफ अलिबागने आपापसातील स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने महाबळेश्वर येथे दोन दिवसांची सहल आयोजित केली. १६एप्रिल, २०२६ आणि १७एप्रिल, २०२६ असे दोन दिवस सर्व लायन्स सभासदांनी सहलीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. क्लबमधील ३५जणांनी होकार कळवला. त्याप्रमाणे बसचे बुकिंग करण्यात आले. याकामी लायन रोहन पाटील, संतोष पाटील, रणजित जैन, मिलिंद मगर, तुषार नाईक यांनी नेतृत्व करून सहल यशस्वी केली. यामध्ये इतर सर्व सभासदासोबत नुकतेच घोषित झालेले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक,अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, महेंद्र पाटील, राजेश शेठ, अनिल आगाशे व इतर लायन मेंबर्स होते. प्रवास, तेथील पार्श्वभूमी पाहणे, आपापसातील स्नेहबंध वृद्धिंगत करण्याच्या हेतूने केलेली सहल नक्कीच यशस्वी झाली.
| Benefited People | 35 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |