मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि चिद्बादेवी देवस्थान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने कुरुळयेथील चिद्बादेवी मंदिराच्या मंडपात दिनांक २७/०९/२०२५रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुरुळ परिसरातील ७३ रुग्णांनी आपली मधुमेह तपासणी करुन घेतली. दोषी आढळलेल्या रुग्णांना योग्य सल्ला देण्यात आला. यावेळी लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे,लायन अविनाश राऊळ, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी, ॲड विजय पाटील, नितीन शेडगे यांच्यासह ॲड प्रसाद पाटील जिल्हा शासकीय रक्तपेढी,अलिबागचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह स्थानिक ग्रामस्थ, नेत्र तपासणी उपक्रमांतर्गत तपासणीसाठी आलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Benefited People | 73 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 200000 |