टीम बिल्डिंग: सांस्कृतिक कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने १ मार्च, २०२६च्या सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारचे फनी गेम्स, कराओके गाणी, समूहनृत्य यासह गप्पा गोष्टी तसेच मनोरंजनाचे इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे शंभराहून अधिक सभासद त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित असल्याने फनी कपलगेमचेही आयोजन झाले. नवीन सभासद तसेच लायन्स क्लब ऑफ अलिबागसाठी मागील पन्नास वर्षांत योगदान दिलेल्या माजी अध्यक्षांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक,सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल जाधव,डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे, नयन कवळे, ॲड प्रदीप पाटील, रमेश धनावडे, अतुल कुलकर्णी, अतुल वर्तक,महेंद्र पाटील यांच्यासह शंभराहून अधिक लायन्स सभासद उपस्थित होते. अखेर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
| Benefited People | 160 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 15000 |