• District 3231A4

    Be The Sunshine

Club Social Activities

ई वेस्ट कलेक्शन

19 Apr 2026

ई गार्बेजचे (ई वेस्ट) मोठ्या प्रमाणावर संकलन : लायन्स क्लब ऑफ अलिबागचा महत्त्वाकांक्षी उपक्रम येथील लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने दिनांक १९एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या आठवड्यात ई वेस्टचे मोठ्या प्रमाणावर संकलन केले जात आहे. सामान्यपणे इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त झाल्यानंतर त्या कचऱ्यात टाकून दिल्या जातात. त्यामधील पारा, शीसे आणि इतर अनेक अविघटनशील पदार्थांमुळे जमिनीची सुपीकता कमी होते. प्रदुषण वाढते. जमीन नापीक होते. त्यामुळे अशा वस्तूंची शक्य असल्यास वेळेत दुरुस्ती करून पुनर्वापर करावा किंवा तीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी दान करावी, ज्यायोगे रिसायकलिंगद्वारे तिचा पुनर्वापर करता येईल. येणाऱ्या पिढीच्या हाती प्रदुषणमुक्त धरित्री सोपवावी, या उदात्त हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये आजवर अलिबाग नगरपरिषदेच्या सहकार्याने तसेच लायन अध्यक्ष तथा नगरसेवक प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, या उपक्रमांतर्गत पुढाकार घेतलेले अनिल आगाशे, महेंद्र पाटील, मिलिंद मगर, नितीन शेडगे, ॲड शिरीष लेले, ॲड गौरी म्हात्रे, अभिजित आमले, अनिल म्हात्रे, गिरीश म्हात्रे, मेहूल पाटील, प्रदीप वाघमारे, डॉ नितीन भोसले, कांतीलाल शहा, रवी सोनी, राहुल शेठ आणि इतर सर्व लायन सभासदांनी प्रचंड मेहनत घेऊन एक हजार एकशे पन्नास किलोंहून अधिक ई वेस्ट संकलित केले आहे. अनिल आगाशे आणि मिलिंद मगर यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली.

Benefited People 1000
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0