• District 3231A4

    Be The Sunshine

Club Social Activities

लायन्स क्लब अलिबागचे मोफत नेत्र तपासणी शिबिर

10 Sep 2025

लायन्स क्लब अलिबागचे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि सूर्योदय साखरचौथ गणपतीमंडळ, थळ पालथी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. साखरचौथ गणपतीच्या औचित्याने लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे अलिबाग लायन्स अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी फित कापून उद्घाटन केले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अश्रूग्रंथी, तिरळेपणा, मोतिबिंदू या नेत्रविकारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी संदर्भित करण्यात आले. यावेळी ८०रुग्णांची तपासणी करण्यात येऊन, त्यातील चाळीस जणांना संदर्भित करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रदीप नाईक, माजी अध्यक्ष अविनाश राऊळ, नितीन शेडगे, संजय माळी,प्रकाश देशमुख,समिर कवळे,विकास घरत,मनोज ढगे, संतोष पाटील, लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागच्या डॉ शीतल कुडतलकर, इतर वैद्यकीय स्टाफ, तर सूर्योदय साखरचौथ गणपती मंडळाचे अध्यक्ष योगेश म्हात्रे, खजिनदार स्वप्निल म्हात्रे इतर सदस्य, नेत्र आणि मधुमेह तपासणीसाठी आलेले रुग्ण तसेच थळ व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Benefited People 80
Raised Of Amount 15000
Donated Of Amount 15000