लायन्स अलिबागने भरवल्या सुदृढ बालक स्पर्धा लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि चिद्बादेवी देवस्थान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने कुरुळयेथील चिद्बादेवी मंदिराच्या मोकळ्या परिसरात शनिवार दिनांक २७/०९/२०२५रोजी सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुरुळ परिसरातील काही शाळांसह , परिसरातील मातापालक आपल्या बालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेसाठी ऐंशीहून अधिक बालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामधून काही निकषांवर आधारित परीक्षणातून, विजयी स्पर्धक बालकांसह पालकांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र, खाऊ, भेटवस्तू देण्यात आली. तसेच उत्तेजनार्थ तीन विजेते घोषित करुन त्यांच्या पालकांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे,लायन अविनाश राऊळ, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी, ॲड विजय पाटील, नितीन शेडगे यांच्यासह ॲड प्रसाद पाटील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह , मान्यवर परीक्षक,स्थानिक ग्रामस्थ, मातापालक, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Benefited People | 82 |
Raised Of Amount | 0 |
Donated Of Amount | 10000 |