• District 3231A4

    Be The Sunshine

Club Social Activities

ठिबक सिंचनाची व्यवस्था

07 Apr 2026

वृक्षारोपण ठिबक सिंचन येथील वेश्वीच्या दत्तटेकडीवर दोनशे फळझाडे लावून, त्यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आल्याने वृक्षसंवर्धन आणि संगोपनाची जबाबदारी आपोआपच येऊन पडली. ही जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यात अलिबाग लायन्स क्लबचे ज्येष्ठ लायन सदस्य तथा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे यांनी झाडांच्या नियमित पाणी पुरवठ्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. त्यासाठी रोख तीस हजार रुपयांची रक्कम देऊन, सदर प्रणाली कार्यान्वित केली. त्यामुळे यापुढे सदर झाडे नक्कीच फळे, फुले, सावली देतील याची खात्री वाटते. यामुळे जुलै २०२५मध्ये वृक्षारोपण केलेल्या साधारणपणे २०० झाडांचे संवर्धन होणार असून, वृक्षजतनाचा संदेश व अनुषंगिक फायदे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचतील. अलिबाग लायन अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सदर रक्कम क्लबच्या वतीने स्वीकारुन ठिबक सिंचनाची उत्तम व्यवस्था केली आहे. यावेळी अलिबाग लायन्सचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Benefited People 0
Raised Of Amount 0
Donated Of Amount 30000