लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि लायन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग शेजारील कुरुळ येथे चेकडॅमचे भूमीपजन करण्यात आले. पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा ' या वैज्ञानिक सूत्राचा वापर करुन, छोटे मोठे बंधारे बांधून समस्या निकाली काढण्यात येते. कुरुळ या ठिकाणची नैसर्गिक पार्श्वभूमी पाहून तिथे सदर बंधारा बांधण्यात येत आहे. पिण्यासाठी, शेती, गुरे तसेच इतर सर्व वापरासाठी सदर पाणी निश्चितच सर्व गावकऱ्यांना उपयोगी पडेल. या भूमीपूजनप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन संजीव सूर्यवंशी, लायन्स इंटरनॅशनलचे पंकज मेहता, फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, सेकंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नयन कवळे, अलिबाग लायन्सचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लायन नयन कवळे, अनिल म्हात्रे, अंकिता म्हात्रे,नमिता मिश्रा , महेंद्र पाटील तसेच इतर लायन मेंबर्स आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
| Benefited People | 6000 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 250000 |