लायन्स क्लब अलिबागच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिर यशस्वी : तब्बल २१० बॉटल्सचे संकलन येथील लायन्स क्लब अलिबाग आणि रायगड श्रमिक एकता संघाच्या वतीने लायन संजय माळी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने महारक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे थळ पेठ येथे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल २१०बॉटल्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित करून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला. थळ ग्रामस्थ, लायन्स सभासद, आरसीएफ कर्मचाऱ्यांसह सी आय एस एफच्या जवानांनीही रक्तदान करुन समाजाप्रती आपली कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी सिद्ध केली. आरसीएफ थळ युनिटचे कार्यकारी संचालक नितिन हिरडे, जिल्हा प्रांतपाल (इलेक्ट)प्रवीण सरनाईक, नगरसेवक तथा अलिबाग लायन अध्यक्ष प्रदीप नाईक, संजय पाटील, नयन कवळे, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत पाटील,या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी २१० बॉटल्स रक्त संकलन म्हणजे तेवढ्या प्रमाणात संजय माळी यांनी जीवनदान दिल्याची टिप्पणी प्रवीण सरनाईक यांनी केली. यावेळी इलेक्टेड द्वितीय प्रांतपाल नमिता मिश्रा, महेश कवळे, अमोघ किंजवडेकर, नितीन शेडगे, तुषार नाईक, विकास घरत, अविनाश राऊळ, मनोज राऊळ, समीर कवळे, मनोज ढगे, प्रकाश कवळे, महेंद्र पाटील, संतोष पाटील, श्रद्धा राणे, शुभदा कुडतलकर , आरसीएफचे व्यवस्थापक महेश पाटील, जिल्हा शासकीय रक्तपेढीचे डॉ गोसावी, जनसंपर्क अधिकारी कवळे, सी.आय.एस.एफ. डेप्युटी कमांडर आदी उपस्थित होते.
| Benefited People | 210 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |